Monday, July 19, 2021

व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 5).

 व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 5).


आता आपण कॉमर्स मधील विविध कोर्सेस ची माहिती घेऊया. पूर्वी बीकॉम म्हणजे बीकॉम जनरल एवढाच कोर्स असायचा, पण आता 10+2 केले की बीकॉम मध्ये विविध कोर्सेस शिकायची संधी उपलब्ध आहे. सर्वसाधारण मंडळी बीकॉम म्हणजे अकौंटिंग असेच समजतात. होय बीकॉम मध्ये अकौंटिंगला महत्व आहेच पण त्या पेक्षा जास्त महत्व आहे ते आपण कोणता व्यवसाया समबंधी आपण अभ्यास करणार  त्याला.काही लोक बीकॉम हा पुढील शिक्षणाचा पाया समजतात तर काही लोक याच ठिकाणीं स्पेशलायझेशन करून सरळ नोकरी किंवा व्यवसायाचा मार्ग पत्करतात.

सध्या भारतात बीकॉम मध्ये खालील  विविध कोर्स उपलब्द आहेत.

BCom Applied Economics
BCom Economics
BCom Marketing
BCom Accountancy
BCom Finance
BCom Financial Markets
BCom Financial Accounting
BCom Accounting and Finance
BCom Banking and Finance
BCom Banking Management
BCom Banking and Insurance
BCom Insurance Management
BCom Capital Market
BCom Tourism and Travel Management
BCom Business Economics
BCom Business Administration
BCom Computer Applications
BCom Corporate Secretaryship
BCom E-Commerce
BCom Foreign Trade Management
BCom Management Studies
BCom Statistics
BCom Supply Chain Management
BCom Tax Procedure and Practice
BCom Taxation
BCom Computer Science

सर्व कोर्सेस सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत असे नाही पण नवीन आलेली विद्यापीठे आणि डीम किंवा ऑटोनॉमस विद्यापीठे असे वेगवेगळे विषय थोड्याफार फरकाने सिल्याबसमध्ये बदल करून शिकवत असतात.

जी मंडळी अकौंटनसी मध्ये करियर करू इच्छितात ती पुढे चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा देतात. ही परीक्षा ICAI ( Institute of chartered accountant of india) ही संस्था घेते आणि ती त्रिस्तरीय ( Foundation, Inter, Final ) परीक्षा असते. सरकारी दरबारी कोणतेही हिशोब, टॅक्स समबंधी विवरण पत्रे, बँकेमधील वित्त पुरवठा, प्रोजेक्ट फायनांसिंग या सर्व ठिकाणी चार्टर्ड अकाउंट च्या सही आणि सर्टिफिकेट ला फार महत्व आहे. विविध कंपन्यांचे किंवा संस्थांचे ऑडिट करून सरकारला किंवा योग्य त्या सक्षम प्राधिकरणाला ते सादर करण्याचे अधिकार याना असतात. सत्यम घोटाळा झाल्यापासून 2013 साली स्थापन झालेल्या नॅशनल फायनान्शियल रिपोर्टइंग औथोरिटी च्या निर्मितीमुळे चार्टर्ड अकाऊंट च्या ऑडिटिंग औथोरिटीवर आणखी नवे निरबन्ध आले / येऊ घातले आहेत. ह्या परीक्षा कठीण असून त्याचे 2020 चे % पासिंग 5.84 एवढे आहे ( या पूर्वी ते आणखी कमी होते पण विविध क्लासेसच्या मार्गदर्शनामुळे त्यात थोडी वाढ झालेली दिसते). चार्टर्ड अकाउंट ही डिग्री भारतात मौल्यवान आहे पण जगभर हिची किंमत एखाद्या पोस्ट कॉमर्स ग्रॅज्युएट एवढीच आहे. 


आता जानेवारी 2021 पासून अमेरिकन CPA ( सर्टीफाईड पब्लिक अकाउंट) ही परीक्षा भारतात बसून देता येते. ह्या  परीक्षेला जगभर मान्यता असून जगातील मोठ्या 4 कंन्सलटिंग आणि ऑडिटिंग  कम्पन्या तसेच भारतातील 100 पेक्षा जास्त मल्टिनॅशनल कम्पनी ही परीक्षा पास असलेले लोक निवडतात. ( डलोईट, अर्न्सट अँड यंग, केपीएमजी, प्राईस वॉटर हाऊस कुपर्स या जगातील त्या 4 मोठया कन्सलटिंग कम्पन्या असून सम्पूर्ण जगात त्यांचे  एकंदर 12 लाख एम्प्लॉई आहेत आणि जगातील फॉरचून 500 कम्पनी पैकी 457 कम्पन्याचे ही मंडळी ऑडिट करतात, त्यांना मॅनेजमेंट सल्ले देतात). याचे क्लासेस ऑनलाइन तसेच भारतात उपलब्ध असून मार्गदर्शन मिळते. अर्थात थोडे महाग असणारच. अनेक भारतीय कम्पन्याचे शेयर अमेरिका आणि इतर देशातील स्टॉक एक्सचेंज वर उपलब्ध असल्याने त्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय विवरणासाठी सुद्धा अशा मंडळींचा उपयोग होतो.

अमेरिकेतील CPA खालोखाल दुसरी महत्त्वाची परीक्षा म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटंट ची. ही परीक्षा अमेरिकेतील 2 वेगवेगळ्या संस्था घेतात एकाचे नाव आहे चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंट ( CIMA) तर दुसरीचे नाव आहे चार्टर्ड मॅनेजमेंट अकाऊंट ( CMA).अमेरीकेत जी संस्था चार्टर्ड पब्लिक अकाउंटंट ची परीक्षा घेते तीच संस्था  चार्टड मॅनेजमेंट अकाउंटंट ची (CMA) परीक्षा सुद्धा घेते. 

सर्वसाधारण चार्टर्ड अकाउंटंट किंवा अमेरिकन CPA च्या अभ्यासाचा किंवा कामाचा भर त्या त्या  देशातील टॅक्सएशन, सरकारी नियंत्रणे आणि त्याचे कम्पनिवरील परिणाम या विषयावर असतो. कंपनीना या शिवाय वेगळ्या अकोणटिंग ची गरज असते ती म्हणजे मॅनेजमेंट अकोणटिंगची. या विषयात  फायनान्शियल अकाउंटिंग आणि स्त्रातीजिक मॅनेजमेंट या विषयात कम्पनीचा विविध आर्थिक घडामोडींचा सतत उहापोह केला जातो. ह्या दोन्ही परीक्षा सुद्धा भारतात उपलब्द असून त्यांच्यात चढाओढ आहे. दोन्ही परीक्षा जगभर मान्य आहेत आणि बिग 4 कन्सल्टन्सी कम्पन्या या मंडळींना जॉब देतात.

काही मंडळी कॉस्ट आकाउंटिंग मध्ये करियर करतात. भारतात इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट ऑफ इंडिया ( ICMAI) ही संस्था Cost Management Accountant (CMA) ही परीक्षा घेते. अमेरिकन CMA आणि भारतीय CMA या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे आपल्या लक्षात आले असेलच.  2013 च्या कम्पनी ऍक्ट प्रमाणे काही विशिष्ट प्रकारच्या  कंपनीना विशिष्ट टर्न ओव्हर झाल्यावर त्यांच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस वरील झालेल्या इनपुट खर्चाचा रेकॉर्ड एका ठराविक पद्धतीने ठेवायला लागतो आणि त्याचे ऑडिट सर्टीफाईड कॉस्ट मॅनेजमेंट आकाउंटंट कडून करून घ्यावे लागते. या साठी किंवा कम्पनीला आपल्या मालाची किंमत ठरवण्यासाठी अशा प्रकारच्या अकाउंटंट ची गरज असते.

खरे म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडिया ( ICAI ),  इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ( ICSI),  इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट ऑफ इंडिया ( ICMAI), ( पूर्वीची इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट (ICWA)) ही युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन च्या नियमितपणे अभ्यास शिकवून परीक्षा घेणारी विद्यापीठे नसल्यामुळे त्यांच्या डिग्री पूर्वी सर्टिफिकेट सारखी मानली जायची, परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनने चार्टर्ड अकाऊंटंट, कम्पनी सेक्रेटरी आणि कॉस्ट मॅनेजमेंट अकाऊंटंट ह्या डिग्री मास्टर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट दर्जाच्या मानण्याचे मान्य केले.

कॉमर्स मध्ये अजून बरेच कोर्सेस आहेत त्यांची माहिती पुढील लेखात मांडुया.

माधव भोळे

No comments:

Post a Comment

व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 11).

व्य वसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 11). आज आपण एका वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. कोणी त्याला मास मीडिया म्हणतात तर कोणी त्याला मास कम्यु...