व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 9).
आज आपण एका नव्या परंतु आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित विषयासंबंधी
समजून घेऊया.
हा विषय सुद्धा कॉमर्स या विषयाशी संबंधीत आहे.
आपण आता सप्लाय चेन, लॉजीस्टिक्स आणि ट्रान्सपोर्टेशन, इन्व्हेंटरी
मॅनेजमेंट, पर्चेस मॅनेजमेंट या विषयाबद्दल बोलत आहोत. वाण्याकडे गेलो आणि एखादा
माल मिळाला नाही की वाणी सांगतो, वाशी मार्केट दोन दिवस बंद आहे कारण ट्रक
वाल्यांचा स्त्राईक आहे. भाजी बाजारात गेल्यावर तोच अनुभव येतो. म्हणजेच आपल्याला
मिळत असलेल्या वस्तू कोठेतरी उत्पादित होत असतात आणि कोठेतरी विकल्या जातात आणि
त्या तेथुन येथे नेण्याचे काम ट्रकवाले, टेम्पोवाले, रेल्वे मालगाड्या म्हणजेच रोड
ट्रान्सपोर्ट ( सरफेस ट्रान्सपोर्ट ), शिपिंग कम्पन्या (मारिन ट्रान्सपोर्ट)
आणि कार्गो विमाने (एयर ट्रान्सपोर्ट ) करतात. ह्याला लॉजीस्टिक्स असे म्हणतात.
नंतर मोठं मोठ्या गोडाऊन, कँटेंनर यार्डमध्ये हा माल साठवून तो योग्य ठिकाणी
वापरण्यासाठी लॉजीस्टिकस ने पाठवला जातो त्याला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणतात
आणि उत्पादनासाठी किंवा विक्रीसाठी कोणाकडून, कुठला माल, काय
गुणवत्तेचा, किती किमतीत विकत घ्यायचा याला परचेसिंग म्हणतात. ह्या सर्व विषयांना
एक नाव आहे ते म्हणजे सप्लाय चेन अँड लॉजीस्टिक्स म्हणतात. घरातील स्त्री हे सर्वच
काम छोट्या प्रमाणात करत असते की!!. एकट्या भारतीय रेल्वे ची माल वाहतूक सेवा ही
1,17, 386 करोड रूपये ( 20-2021) असून तिने त्या
वर्षात 1.232 बिलियन माईल्स टनेज एव्हढी वाहतूक केली आहे या वरून या विषयाची
व्याप्ती कळेल. (भारतीय रेल्वेने तिची क्षमता वाढवण्यासाठी स्वतंत्र फ्रेट कॉरिडॉर
तयार करण्यास सुरवात केली आहे).
या विषयात भारत अजूनही खूप पाठी आहे. नाशिवंत शेतमाल, भाज्या आणि
फळे या विषयात, प्रक्रिया क्षमता, शीतगृह ( कोल्ड स्टोरेज) सारख्या सप्लाय चेन आणि
लॉजीस्टिक्स मधील त्रुटीमुळे देश या विषयात 16% नुकसान करतो. हे आकडे बदलत असतात.
तसेच या विषयावर दुर्लक्ष झाल्यामुळे भारत इंधन आणि पर्यावरण या दोन्ही विषयांवर
नुकसान करत असतो.
सर्व प्रकारच्या उत्पादन कम्पन्या ( Manufacturing units), तसेच
हिंदुस्थान लिव्हर, आय टी सि, गोदरेज कंसुमर सारख्या FMCG कम्पन्या, ई
कॉमर्स कम्पन्या, सुपर मार्केटस या सारख्या अस्थापनामध्ये यातील प्रशिक्षित
मंडळींची खूप गरज आहे. आपण बघितले असेल, अनेक कंपन्यांच्या या विषयातील
अव्यवस्थापना मुळे कम्पन्या प्रचंड नुकसानीत गेल्या आहेत. जस्ट इन टाइम
इन्व्हेंटरी, Simplex Method, रूट मॅनेजमेंट सॉफ्टवेयर सारखे नवनवीन प्रकार या
विषयात आता वापरले जाऊन बचत करण्याला सुरवात झाली आहे. एक साधे ब्रिद वाक्य लक्षात
घ्या पैसे वाचवणे म्हणजे पैसे कमावणेच समजा. या विषयात कोणताही ग्रॅज्युएट काम
सुरू करू शकतो.
1983 साली तयार झालेली Indinan Institute of Materials management
(iimm.org) ही संस्था या
विषयात
- ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मटेरियल्स 1 yr distance education
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मटेरियल्स मॅनेजमेंट (PGDMM) 2 yrs distance AICTE
approved
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड लॉजिस्टिकस (PGDSCM
& L) 2 yrs Distance education ( AICTE approved) तसेच
-- Professional diploma in public procurement ( PDPP) sponsered
by world bank. ( Online learning).
-- International Diploma in Purchasing and Supply Chain
Management ( IPSCM) हा 18 महिन्याचा distance education, International Trade
Center, Geneva चा कोर्स जो युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेंड अँड डेव्हलपमेंट
( UNCTAD) आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनिझेशन ( WTO) या दोघांच्या संयुक्त विध्यमाने
आहे.
- Certified professional in Supply Chain ( CPSM) हा इन्स्टिट्यूट
ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट ( ISM - USA) चा डिस्टनस एज्युकेशन प्रोग्रॅम असून त्याची
परीक्षा ऑनलाइन घेतली जाते.
या विषयात अजूनही काही सर्टिफिकेट कोर्सेस शिवाय एक्सपर्ट
सर्टिफिकेशन हया संस्थेतर्फे घेतले जातात जे आपणास वरील वेबसाईटवर माहीत होईल.
ह्या शिवाय इन्स्टिट्यूट ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट इंडिया ही ISM-
USA चा भारत विभाग असून तिच्यातर्फे सर्टीफाईड प्रोफेशनल इन सप्लाय चेन मॅनेजमेंट
(CPSM ) ह्या परिक्षेची तयारी करून परीक्षा घेतली जाते. हे सर्टिफिकेट जगनमान्य
आहे.
या शिवाय Institute of Integrated Supply chain Management (https://www.iiscm.org) ह्या संस्थेतर्फे अमेरिकन APICS ( American Production and
Inventory control society ) हया जगन्मान्य संस्थेची
- Certified Supply Chain Professional ( CSCP)
- Certified in Logistics, Transportation and Distribution ( CLTD)
- Certified in Production and Inventory Management ( CPIM) ह्या कोर्सेस
चा अभ्यास आणि परीक्षा घेतल्या जातात. शिवाय चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ प्रोकरमेन्ट
अँड सप्लाय, युके, ह्या कोर्स ची सुद्धा तयारी आणि परीक्षा घेतली जाते.
पुढील भागात आपण इम्पोर्ट, एक्स्पोर्ट, इंटरनॅशनल बिझिनेस हे विषय
बघू.
माधव भोळे
No comments:
Post a Comment