व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 8).
आज आपण बँकिंग या विषयाची थोडी माहिती घेऊ.
भारतीय बँकिंग सिस्टीम फार मोठी आहे. ह्या मध्ये 12 सार्वजनिक क्षेत्रातील
बँका, 22 खाजगी बँका, 44 परदेशी बँका, 43 प्रादेशिक ग्रामीण बँका ( regional rural
banks), 1539 नागरी सहकारी बँका ( urban co op banks), 96,000
कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्या आहेत. शिवाय रिझर्व्ह बँकेच्या नवीन धोरणांमुळे 8
पेमेंट बँक आणि 10 small finance bank सुद्धा कार्यरत आहेत. शिवाय फायनान्स या
क्षेत्रात सुमारे 10,000 नॉन बँकिंग फायनांस कम्पन्या ( NBFC) जसे की बजाज
फायनान्स, मुथुट फायनान्स, श्रीराम फायनान्स, टाटा कॅपिटल, महिंद्र फायनस सारख्या
खाजगी कम्पन्या आहेत ज्या बँकेप्रमाणे, पण काही मर्यादा बाळगून काम करू शकतात. या
सर्वांवर रिझर्व्ह बँकेचे थेट नियंत्रण आहे. या 10, 000 NBFC पैकी सुमारे 3000 मायक्रो
फायनान्स कम्पन्या आहेत त्या गरीब वर्गाला अल्प मुदत कर्ज देतात. आपल्या
माहितीसाठी सांगतो की इंटरनेट आल्यामुळे पोस्टातील तार खाते बंद झाले तसेचपोस्टाची
सुद्धा एक पेमेंट बँक आणि पोस्टल लाईफ इन्शुरन्स सुद्धा आहे. गावात पोस्ट खात्यावर
खूप भरवसा असल्यामुळे ह्या विषयात पोस्ट खाते खूप मोठी प्रगती करेल यात शंका नाही.
सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी बँकांमध्ये एकंदर 14 लाख एम्प्लॉई असून
त्यापैकी 8.6 लाख ऑफिसर आहेत. पब्लिक सेक्टर बँकांमध्ये नोकरी मिळण्यासाठी बँकिंग
च्या क्लार्क किंवा प्रोबेशनरी ऑफिसर या पदा समबंधी नोकरीपरीक्षा होतात.
शिवाय बाकीच्या बँका आपापले स्वतःच्या भरती पद्धती ठरवतात. खाजगी बँकांमध्ये
एम बी ए फायनान्स, एमबीए बँकिंग अँड फायनान्स, बी कॉम इन बँकिंग फायनान्स, तसेच
अकोन्ट्स, फायनान्स, मॅनेजमेंट या विषयात अभ्यास केलेली मंडळी नियुक्त केली जातात.
उच्च पदावर आणखी विविध अनुभव आणि शैक्षणिक पात्रता असलेले लोक निवडले जातात.
या सर्वांच्या प्रशिक्षणा साठी आणि बँकिंग क्षेत्रात
सखोल मार्गदर्शन व्हावे म्हणून 1928 साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ
बँकिंग अँड फायनान्स ( IIBF) ही संस्था Ministry of Finance ने स्थापन केली असून
त्यामध्ये अनेक शॉर्ट टर्म कोर्सेस असतात. शिवाय जी लोक बँकेत काम करतात त्यांच्या
ज्ञानात भर व्हावी आणि त्याचे मूल्यमापन व्हावे म्हणून JAIIB (Junior Associate of
Indian Institutue of Bankers) and CAIIB ( Certified Associate of Indian
Institute of Bankers) हया परीक्षा घेतल्या जातात. ह्या परीक्षा पास झाल्यानंतर
लंडन मधील चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ बँकरस ही काही थोडे जास्त पेपर सबमिट करून
चार्टर्ड बँकर ही पदवी मिळवता येते. ती जागतिक पदवी असून अनेक कॉमन वेल्थ देश तसेच
गल्फ मध्ये ह्या पदवीला खूप मान आहे.
शिवाय ट्रेझरी मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बँकिंग, डिप्लोमा इन बँकिंग सारखे अनेक
विविध आणि वैशिष्ट्य पूर्ण कोर्सेस असून त्याचे महत्व बँकेतील त्या त्या विभागात
असते. त्या कोर्सेस ची आणि परीक्षांची माहिती IIBF च्या वेबसाईटवर मिळू शकते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट ही दुसरी संस्था रिझर्व्ह बँके आणि
इतर सहकारी बँकांनी कोंढवा, पुणे येथे 1969 साली स्थापन केली. येथे बँकिंग
क्षेत्रातील संशोधन आणि व्यवस्थापन विषयक वेगवेगळ्या
क्षेत्रात मार्गदर्शन केले जाते. ही ऑटोनोमस बॉडी असून त्यात PGDM (
Banking and Finance) हा AICTE मान्यता असलेला मॅनेजमेंट कोर्स सर्वांसाठी खुला
आहे. यातील कोर्सेस बहुतेक मॅनेजमेंट कॅडरला उपयुक्त आहेत.
पुण्यामध्ये वैकुंठलाल मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट
ह्या संस्थेतर्फे कोऑपरेटिव्ह बिझिनेस मॅनेजमेंट या विषयात एक AICTE मान्यता प्राप्त
PGDM कोर्स शिकवला जातो तो कोऑपरेटिव्ह बँकांमधील स्टाफ ला उपयोगी आहे.
या शिवाय को ऑपरेटिव्ह बँकींग विषयावर यशदा,
डॉ विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, डॉ धनंजय
गाडगीळ इन्स्टिट्यूट कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, कॉलेज ऑफ ऍग्रीकलचरल बँकिंग,
महाराष्ट्र राज्य सहकार प्रशिक्षण केंद्र या संस्था सुद्धा प्रशिक्षण देतात.
बँकांमध्ये आता नुसते डिपॉझिट घेणे आणि लोन देणें एवढेच काम राहिले नसून
नवनवीन गुणवणूक प्रोडक्टस, विमा, नवनवीन रिटेल बँकिंग लोन्स, बिल डिस्काउंटिंग,
फॅक्टरिंग, पोजेक्ट फायनान्स, मर्चंट बँकिंग, फॉरेक्स ट्रेडिंग अशा असंख्य
विषयात काम होत असते आणि मागे लिहिलेली बरीचशी कामे या ठिकाणी सुद्धा होत
असतात.
याबरोबरच आपण बँकिंग, फायनान्स, सिक्युरिटीज आणि इन्शुरन्स ( BFSI) या एका
मोठ्या क्षेत्रातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी विषयी लेखन समाप्त करत आहोत.
आता सेक्रेटरी या विषयात आपण माहिती घेऊया. सेक्रेटरी या विषयात पूर्वी
स्टेनोग्राफर ला महत्व होते पण आता कम्प्युटर आल्यामुळे फक्त सिनियर मॅनेजमेंट ला
पर्सनल सेक्रेटरी असतात. त्या साठी वेगवेगळ्या खाजगी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये
सेक्रेटरीयल प्रॅक्टिस हे प्रशिक्षण मिळते. कोणताही ग्रॅज्युएट जो व्यवस्थितपणा
(systimaticness), इंग्रजी आणि इतर भाषांवर प्रभुत्व, कॉम्प्युटर मधील
मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ( MS office) ज्ञान आणि कामातील तत्परता या सारख्या
प्राथमिक गुणांवर ही नोकरी करू शकतो.
स्टॉक एक्सचेंजवरील सर्व पब्लिक लिमिटेड कम्पनी आणि मोठ्या लिमिटेड किंवा
प्रायव्हेट लिमिटेड कम्पन्यानमध्ये कम्पनी सेक्रेटरी ही पोस्ट असते. भारतातील सर्व
लिमिटेड कम्पन्या ह्या कम्पनी कायद्याप्रमाणे चालतात. सर्व लिस्टेड कपन्यांचे
बाबतीत SEBI आणि कम्पनी तसेच सर्व लिमिटेड कम्पन्यानमध्ये भागधारक आणि कम्पनी
व्यवस्थापन या मध्ये कम्पनी सेक्रेटरी हा दुवा असतो. छोट्या कम्पन्या ही कामे
सेक्रेटरीयल सर्व्हिसेस कम्पन्यांना आउट सोर्स करतात तर मोठया कम्पन्या स्वतःचे
सेक्रेटरीयल विभाग सांभाळतात. हया कामांची माहिती व्हावी यासाठी मिनिस्ट्री ऑफ कम्पनी
अफेयर्स या सरकारी विभागाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कम्पनी सेक्रेटरीज स्थापन केली
असून तिच्या तर्फे कंपनी सेक्रेटरीची परीक्षा घेतली जाते. ही प्रोफेशनल
परीक्षा असून ती पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री समान मानली जाते. कॉर्पोरेट गव्हर्ननन्स
ह्या विषयाला सध्या चांगले दिवस आले असून जास्तीत जास्त पब्लिक लिमिटेड कम्पन्या
या विषयात आपला दर्जा सुधारायचा प्रयत्न करत आहेत कारण भागधारक आणि SEBI, दोन्हीना
त्याची गरज आहे. या विषयात कम्पनी सेक्रेटरी ही योग्य व्यक्ती आहे.
बहुतेक कम्पनी सेक्रेटरी हे कायद्याच्या पदवीधर सुद्धा असतात. कारण अनेक
मध्यम आकाराच्या कम्पन्या मध्ये कायदे विभाग नसतो त्यामुळे कम्पनीच्या विविध
कामासाठी या मंडळींना सॉलिसिटर किंवा वकिलांशी सल्ला मसलत करण्याची वेळ येते.
या शिवाय भारत सरकारच्या कम्पनी अफेयर्स विभागात काम करण्यासाठी UPSC ची एक
विशेष परीक्षा आहे ती म्हणजे Indian Corporate Law Service (ICLS).
माधव भोळे
No comments:
Post a Comment