Monday, July 19, 2021

व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 6).

 व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 6).

लेख नंबर 5 मध्ये आपण कॉमर्स मधील काही आकाउंटंनसी संबंधी कोर्सेस बघितले. आता फायनान्स या विषयातील कोर्सेस बघूया.

आकाउंटंंसी हा फक्त फायनान्सचा पाया झाला, पण संस्था किंवा कम्पन्या या आकडे मोडीतून काय निष्कर्ष काढतात? ही आस्थापने आर्थिक दृष्ट्या किती सक्षम आहेत? आस्थापनाची पुढील दिशा बघता त्यांना आणखी वित्त पुरवठ्याची गरज आहे काय? असलेला पैसे ते योग्य रीतीने वापरत आहेत काय? जर ह्या संस्थेने काही कर्ज घेतले असेल तर ते परत फेडण्याची काय योजना असेल? फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट, नवीन गुंतवणूक पर्याय कसे वापरता येतील? कम्पनीचा पसारा कसा वाढवता येईल? अशा प्रकारची माहिती मालक किंवा भागधारकांना मिळणे अतिशय आवश्यक आहे.

अमेरिकन चार्टर्ड फायनान्शियल एनलिस्ट ( CFA)  ही संस्था अशा प्रकारच्या सिल्याबस वर काम करून त्याच्या परीक्षा घेत असते. हिला जगभरात मान्यता आहे. फायनान्शियल कम्पनी, रेटिंग एजन्सी, इन्व्हेस्टमेंट बँकिंग तसेच ईतर अनेक वेगवेगळ्या मोठ्या अस्थापनांमध्ये CFA हे पद असते. ही परीक्षा भारतात उपलब्ध असून  त्या समबंधी खालील ठिकाणी अधिक माहिती मिळू शकेल.

CFA Institute India Private Limited
702, 7th Floor, A Wing
One BKC Tower, G Block
Bandra Kurla Complex
Mumbai 400 051, India
On the toll free numbers for India: 000-800-100-4025 Telephone +91 22 6179 8900.

भारतात सर्वसाधारणपणे सरासरी चार्टर्ड अकाउंटंट ( CA) चा वार्षिक पगार 6.5 लाख आणि पुढे अनुभवाप्रमाणे आणि पदाप्रमाणे वाढतो तो पुढे 20 लाख पर्यन्त जातो, तर CPA चा सरासरी पगार 9.25 लाख आणि पुढे 35 लाख पर्यन्त, CMA चा सरासरी पगार 7 लाख ते 20 लाख,  तर CFA चा पगार 3 लाख ते 12 लाख पर्यन्त जातो. अर्थात हा सरासरी आणि सर्वसाधारण पगार असून प्रत्येक विषयात अपवाद असतात. शिवाय दिलेली परीक्षा किती प्रयत्नात ( Attempt) मध्ये पास झाला आहे यावर सुरवतीचा पगार अवलंबून असतो.

अमेरिकन CFA च्या जवळपास जाणारा दुसरा एक अमेरिकन कोर्स आहे त्याचे नाव फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट ( FRM) असे आहे. हा कोर्स थोडा स्पेशलायझेशन असलेला कोर्स आहे. इन्व्हेस्टमेंट बँक, असेट मॅनेजमेंट कम्पनी ( म्युचल फ़ंड),  असेट रिसोल्युशन कम्पनी, क्रेडिट रेटिंग सारख्या वित्तसंस्था, मोठं मोठे गुंतवणूकदार, बँका, मर्चंट बँका, NBFC, इन्शुरन्स कम्पनी या सर्व ठिकाणी रिस्क मॅनेजमेंट हा एक वेगळा विभाग असतो आणि  कित्येक ठिकाणी जेथे फायनान्शियल मार्केट मध्ये व्यवहार होतात तेथे तर मिनिटा मिनिटाला रिस्क मॅनेजमेंट केली जाते.

1762 साली स्थापन झालेल्या बेयरिंगस बँक, इंग्लड या जगातील एका मोठया  मर्चंट बँकेच्या 28 वर्षीय निल लेसन नावाच्या एका यशस्वी डेरिव्हेटिव्ही ट्रेडर ने काही चुकीच्या, धोकादायक चाली फ्युचर आणि ऑप्शन व्यवहारात लावल्यामुळे ती बँक एका दिवसात जवळजवळ 1.3  बिलियन डॉलर लॉस मध्ये गेली. बँकेच्या रिस्क मॅनेजमेंट चे कमकुवत अंतर्गत नियंत्रण आणि निलने आपल्या ट्रेड रेकॉर्डस् मध्ये केलेली बनवाबनवी यामुळे  फेब्रुवारी 1995 साली 233 वर्ष जुन्या असलेल्या बँकेने दिवाळखोरी जाहीर केली.

आपल्याकडील पीएमसी बँक घोटाळा, यस बँक घोटाळा, मेहुल चोकसी आणि निरव मोदी पंजाब नॅशनल बँक घोटाळा, स्टर्लिंग बायोटेक घोटाळे हे अंतर्गत रिस्क मॅनेजमेंट नसल्यामुळे किंवा कमकुवत झालेले असल्यामुळे झालेले घोटाळे असून, आता रिस्क मॅनेजमेंट ला फार महत्व आले आहे.

FRM चा सरासरी वार्षिक पगार 11,00, 000 असून फ्रेशर साठी तो 3 ते 5 लाख एव्हडा असतो.

ऑडिटिंग:
आता आपण ऑडिटिंग या विषयावर बोलू. प्रत्येक व्यवस्थापना मध्ये ऑडिटिंग या विषयाला फार महत्व आहे. ऑडिटिंग चा मूळ उद्देश संस्था करत असलेले व्यवहार सरकारी मार्गदर्शक तत्वांप्रमाणे, आणि पारदर्शक  होेतात की नाही? ते करत असताना व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयाची तसेच निरबंधांची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही? या मध्ये काही हेतपुरस्सर लांडी लबाडी होत आहे काय? सर्व प्रकारची आवश्यक रजिस्टर, कागदपत्रे ठेवली जात आहेत की नाही? असे अनेक विषय ऑडिट मध्ये येतात. ऑडिटिंग मुख्यत्वे 2 प्रकारचे असते, 1) अंतर्गत हिशेब तपासनीस ( Internal auditor) 2) बाह्य हिशेब तपासनीस ( External auditor ).

अंतर्गत हिशेब तपासनिसाला भारतात विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही परंतु बाह्य हिशेब तपासनीस हा सरकारी पॅनल वरील नोंदणीकृत चार्टर्ड अकाऊंटंट असावा. कोऑपरेटिव्ह सोसायट्यांमध्ये डिप्लोमा इन कोऑपरेटीव्ह अँड अकाउंटंन्सि किंवा डिप्लोमा इन को ऑपरेटिव्ह ऑडिट पास झालेली व्यक्ती बाह्य ऑडिट करू शकते.

राष्ट्रपती, भारत सरकारच्या वतीने कॉम्पट्रोलर अँड औडिटर जनरल ऑफ इंडिया ( CAG) हा भारत सरकारच्या विविध खात्यांचे तसेच भारत सरकारच्या पैशाची कोणत्याहि पब्लिक किंवा खाजगी अस्थापनात गुंतवणूक असल्यास तिचे हिशोब तपासण्याचा त्याला अधिकार आहे. सध्या त्याच्या खात्यात 43, 576 एवढे औडिटर काम करतात आणि तो त्यांचा प्रमुख असतो. देशातील नोकरशहांच्या रांगेत त्याचा 9 वा क्रमांक असून त्याचा दर्जा सुप्रीम कोर्ट जज्ज एवढा आहे. CAG ने तयार केलेले रिपोर्ट्स राष्ट्रपती किंवा राज्य सरकारचे बाबतीत राज्यपालांना दिले जातात आणि ते पुढे संसद किंवा विधान सभेत ठेवले जातात. संसदेमध्ये एक Parliamentary commitee on Finance असते आणि ती या ऑडिट रिपोर्ट वर अभ्यास करून कोणत्याही खात्याच्या प्रमुख प्रशासकीय अधिकारी किंवा त्या खात्याच्या मंत्र्याला एव्हढेच काय तर पंतप्रधानाना सुद्धा बोलावून ऑडिट रिपोर्ट मधील टिप्पणीवर प्रश्न विचारू शकते. हे ऑडिट रिपोर्ट सरकारच्या कारभाराचे असतात त्यामुळे या पार्लमेंट कमिटीचे अध्यक्षपद हे नेहमी विरोधी पक्षाकडे असते आणि त्यात सर्व पक्षीय सदस्य असतात. एव्हडे या ऑडिटिंग ला महत्व आहे. भारताचा १५ वा पूर्व ऑडिटर जनरल विनोद राय याने 2 G आणि कोळसा घोटाळा बाहेर काढून त्यातील सर्व लिलाव सुप्रीम कोर्टाने रद्दबातल करण्याइतपत त्याचे ऑडिट रिपोर्ट पुराव्यानिशी मजबूत होते. सध्या ते युनायटेड नेशन्स च्या एक्सटर्नल ऑडिटर पॅनल चे प्रामुख आहेत.

भारत सरकारच्या UPSC परीक्षांमध्ये खालील ग्रुप A परीक्षा अकोन्ट्स आणि ऑडिटिंग विषयात घेतल्या जातात.

Indian Audit and Accounts Service (IAAS)
Indian Civil Accounts Service (ICAS)
Indian Defence Accounts Service (IDAS)
Indian Communication Finance Services (ICFS)
Indian Railway Accounts Service (IRAS)
Indian Revenue Service (IRS)

कम्पनी कायध्यप्रमाणे प्रत्येक पब्लिक कम्पनीमध्ये एक ऑडिट कमिटी बनवावी लागते आणि ती भागधारकांतर्फे कम्पनीच्या कारभारावर लक्ष ठेवते.
कम्पनी कायध्याप्रमाणे ठराविक टर्न ओव्हर झाला की पब्लिक किंवा प्रायव्हेट किंवा प्रोप्रा्यटोरी कम्पनीला टॅक्स ऑडिट, किंवा कम्पनी ऑडिट करून घ्यावे लागते.  या शिवाय काही विशेष ऑडिट सुद्धा केली जातात ती खालील  प्रमाणे.

इंटर्नल ऑडिट
एक्सटर्नल ऑडिट
स्टेट्यूटरी ऑडिट
फॉरेसनसिक ऑडिट
फायनाशीयल ऑडिट
टॅक्स ऑडिट
इन्फर्मेशन सिस्टीम ऑडिट
कंपल्यायन्स ऑडिट
ओपरेशनल ऑडिट
रेविन्यू ऑडिट
परफॉर्मन्स ऑडिट
व्हॅल्यू फॉर मनी ऑडिट
सेल्स ऑडिट
डिमांड  अँड सप्लाय ऑडिट

करोना काळात ऑक्सिजन ची वाढवून सांगितलेली मागणी किती खरी किंवा खोटी होती हे डिमांड अँड सप्लाय ऑडिट ने दाखवून दिले.

या शिवाय आता आणखी काही ऑडिट होतात पण ती कॉमर्स विषयात मोडत नाहीत ती म्हणजे

एनवोयरमेन्ट ऑडिट
एनर्जी ऑडिट

असे ऑडिट चें प्रकार आहेत.

माधव भोळे

No comments:

Post a Comment

व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 11).

व्य वसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 11). आज आपण एका वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. कोणी त्याला मास मीडिया म्हणतात तर कोणी त्याला मास कम्यु...