Sunday, July 25, 2021

व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 10).

 व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 10).

 

सप्लाय चेन मॅनेजमेंट चा आणखी एक उपविभाग आहे तो म्हणजे इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट. इम्पोर्ट म्हणजे परदेशातून भारतात वस्तू आयात करणे तर एक्स्पोर्ट म्हणजे भारतातून परदेशात वस्तू निर्यात करणे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या विषयाला फार महत्व आहे. 

 

भारताची आयात आणि निर्यात:

2019 च्या आकडेवारीनुसार भारत 210 देशातून 4356 वस्तूसमूह (HS6 digit level), 478.884 बिलियन डॉलर्स (CIF) एवढ्या किमतीच्या वस्तू आयात करतो तर 226 देशातून 4442 वस्तू समूह (HS6 digit level) 323.251 बिलियन डॉलर्स किमतीच्या वस्तू निर्यात करतो. भारताचा इम्पोर्ट एक्स्पोर्ट पेक्षा जास्त आहे.

 

ही आयात किंवा निर्यात तिन्ही मार्गाने होत असते जसे की सरफेस ट्रान्सपोर्ट, मारिन ट्रान्सपोर्ट, एयर ट्रान्सपोर्ट. या ठिकाणी काही वेळा मल्टी मोडल म्हणजे तिन्ही चा एकत्र वापरत करून आयात निर्यात केली जाते. सप्लाय चेन मॅनेजमेंट मधील हा एक महत्वाचा भाग आहे.

 

या विषयात आयात, निर्यातदारां बरोबरच एक महत्वाचा घटक आहे ते म्हणजे भारतीय कस्टमस खाते. हे भारत सरकारच्या अखत्यारीत येते. जगातील 182 देशांचे मिळून एक वर्ल्ड कस्टमस ऑर्गनिझेशन आहे ( WCO). जगातील 182 देश ह्या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या देशाचे कस्टमस विभाग चालवतात. विशेषतः आयात कर किंवा निर्यात कर, आयात निर्यात कार्य पद्धती, दोन देशांमधील अडचणी सोडवण्याचे काम ही संघटना करते. दोन देशातील असलेल्या आपसातील करारांवर सुद्धा कस्टम खात्यातील व्यवहार  अवलंबून असतो. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनिझेशन ( WTO) वरील निर्बंध सुद्धा या ठिकाणी काम करत असतात. ह्या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणासाठी वेगवेगळे कोर्सेस आणि परीक्षा आहेत.

 

जर आपणास कस्टम ऑफिसर व्हायचे असेल तर एक तर आपण UPSC परीक्षा पास करून IAS, IRS, किंवा Indian Audit and Accounts सर्व्हिसेस  किंवा तत्सम UPSC परीक्षा पास व्हा म्हणजे आपण थेट क्लास A कस्टम ऑफिसर होऊ शकता किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन ( या बद्दल नंतर विशेष माहिती करून घेऊ) ची एकत्रित ग्रॅज्युएट दर्जाची परीक्षा पास करून कस्टमस आणि एक्साईज विशेष परीक्षा देऊन होऊ शकता.

 

कस्टमच्या विविध विषयातील विविध कार्य पद्धती, वेगवेगळे आयात निर्यात कर ही सर्व किचकट व्यवस्था समजून घेणे  आणि त्याची अंमलबजावणी करणे कित्येक उधोग धंद्यांना कठीण जाते त्यामुळे हे आयात निर्यातदार आणि कस्टम विभाग या मध्ये मध्यस्थ दुवा म्हणून कस्टम क्लियरिंग एजंट असतो. तो अधिकृत असावा यासाठी त्याला एक लायसन्स काढावे लागते. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये या विषयात डिप्लोमा इन कस्टम क्लियरिंग अँड फ्रेट फॉरवरर्डिंग शिकवला जातो. तो पास केल्यानंतर 3 वर्षांचा कस्टम क्लियरिंगचा अनुभव आणि रु 5 लाखाची मालमत्ता असेल तर आपण लायसन्स धारी कस्टम क्लियरिंग एजंट बनू शकता. हे एजंट शिपिंग डॉक्स, एयर कार्गो , कँटेंनर यार्ड, बॉंडेड वेयर हाऊस या ठिकाणी काम करतात. या मध्ये लाखो रुपयांची रोज उलाढाल होत असल्यामुळे भरपूर नफा आहे परंतु योग्य अनुभव आणि माहिती झाल्याशिवाय कोणत्याही व्यवसायात पडू नये असे वाटते.  शिवाय चांगली सेवा देणे आणि ग्राहक टिकवणे ही एक कसरत आहे.

 

या शिवाय आपणास कोणत्याही आयात निर्यातदार, शिपिंग कम्पनी, कस्टम  क्लियरिंग एजंट अस्थापनात काम करायचे झाल्यास एक प्राथमिक ज्ञान देणारे डिप्लोमा आहेत जसे की डिप्लोमा इन इंपोर्ट एक्स्पोर्ट किंवा डिप्लोमा इन इंपोर्ट डॉक्युमेंटेशन किंवा डिप्लोमा इन एक्स्पोर्ट डॉक्युमेंटेशन. हे सर्टिफिकेट डिप्लोमा असून भारतातील 1907 साली स्थापन झालेली Indian Merchant Chambers ही व्यापाऱ्यांनी स्थापन केलेली संस्था आहे ते या विषयावर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट किंवा पार्ट टाइम कॉलेजच्या मदतीने किंवा डिस्टनस शिक्षण पद्धतीने घेतात आणि त्याची परीक्षा घेऊन सर्टिफिकेट दिले जाते.

 

या शिवाय 1963 साली भारत सरकारने स्थापन केलेली, भारतात महत्वाची मानली जाणारी संस्था म्हणजे Indian Institute of Foreign Trade, New Delhi. या संस्थेतर्फे MBA in International Business ( 18 months  Full time as well as 36 months Week End programes) हा पदव्युउत्तर अभ्यासक्रम आहे शिवाय इम्पोर्ट एक्स्पोर्ट, सप्लाय चेन लॉजीस्टिक्स मधील वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्स आणि त्याच्या परीक्षा ही संस्था घेत असते त्याची जास्त माहिती आपणास www.IIFT.Edu  वर मिळेल. यातून पास होणाऱ्या विध्यार्थ्यांना मोठ मोठ्या भारतीय तसेच मल्टी नॅशनल कम्पनी मध्ये मानाची पदे मिळतात.

 

माधव भोळे.

 

No comments:

Post a Comment

व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 11).

व्य वसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 11). आज आपण एका वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. कोणी त्याला मास मीडिया म्हणतात तर कोणी त्याला मास कम्यु...