व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 7).
आता पर्यंत आपण कॉमर्स मध्ये आकाउंटिंग, फायनान्स, ऑडिटिंग या विषयातील
माहिती घेतली.
आता आपण फायनान्शियल मार्केटस मधील कोर्सेस ची माहिती घेऊ. पार्लमेंट
च्या 1992 च्या सेबी ऍक्ट प्रमाणे SEBI म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ
इंडिया भारतातील फायनान्शियल मार्केटवर नियंत्रण करते. गुंतवणूकदारांचे हित जपणे,
उद्योग धंद्याना सुलभ भांडवल मिळण्यासाठी असलेल्या स्टोक एक्सचेंज वर
नियंत्रण ठेवणे ही तिची मुख्य कामे आहेत. ईक्विटी आणि कर्ज रोखे, ईक्विटी फ्युचर
आणि ऑप्शन्स, म्युचल फ़ंड, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केट विषयात सेबी
नियंत्रण करते तर रिझर्व्ह बँक फॉरेक्स करन्सी मार्केट, मनी मार्केट,
गव्हर्नमेंट सेक्युरिटीज, इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह आणि क्रेडिट आणि करन्सी
डेरिव्हेटिव्ह या वर नियंत्रण करते.
काही ठिकाणी SEBI, RBI, FCM ( Forward markets Commision) अशा तिन्ही
संस्था नियंत्रण करतात. हा फार मोठा विषय असून जे काही वर्षे फायनान्शियल
मार्केटसशी समबंधीत आहेत किंवा या मध्ये काही काम करायचे आहे त्यांच्यासाठी आहे.
या विषयाची लोकांना पूर्ण माहिती व्हावी यासाठी सेबी ने नॅशनल इन्स्टिट्यूट
ऑफ सिक्युरिटीज मार्केट नावाची एक संस्था निर्माण केली असून तिच्यातर्फे विविध
कोर्सेस ऑनलाईन आणि ऑफ लाईन शिकवले जातात. तिचा कॅम्पस पातळगंगा जवळील वासंबे (
मोहपाडा ), रायगड येथे आहे.
तिच्या तर्फे खालील सर्टिफिकेट कोर्सेस आणि परीक्षा घेतलीे जातात.
फायनान्शियल मार्केट मध्ये काम करायचे झाल्यास यातील काही परीक्षा पास होणे आवश्यक
आहे.
डेरिव्हेटिव्ह
- करन्सी डेरिव्हेटिव्ह
- कमोडिटी डेरिव्हेटिव्ह
- ईक्विटी डेरिव्हेटिव्ह
- इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह
- कॉमन डेेरिव्हेटिव्ह
रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट
सेबी कम्प्लेयन्सेस
म्युचल फ़ंड फाउंडेशन आणि डिस्ट्रिब्युशन
ऑपरेशन
- डिपॉझिटरी ऑपरेशन
- सिक्युरिटीज ऑपरेशन आणि रिस्क मॅनेजमेंट
मर्चंट बँकिंग
इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझर
बेसिक्स ऑफ सिक्युरिटीज मार्केट
रिसर्च अनलिस्ट
इंटर्नल ऑडीटर फॉर स्टोक ब्रोकर
रिटायरमेंट ऍडवाझर
टॅक्सएशन इन सिक्युरिटीज मार्केटस
अलटर्ननेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड
पोर्टफोलिओ मॅनेजमेंट
फिक्स इन्कम सिक्युरिटीज
इनसोलवंसी अँड बँकरपसी रिसोल्युशन आणि व्हॅल्यूएशन
फायनाशीयल मार्केट, म्युचल फ़ंड, शेयर ब्रोकर्स, इन्व्हेस्टमेंट अडवायझर्स,
मर्चंट बँकर्स आणि तत्सम फायनान्शियल संस्था मध्ये या परीक्षा पास झालेली मंडळी
काम करतात.
अशाच प्रकारचे कोर्सेस नॅशनल स्टोक एक्सचेंज ( NSE) ने आधी NSE academy
certification in financhial markets ( NCFM) या माध्यमातून काढले होते परंतु SEBI
प्रायोजक NISM असल्यामुळे NCFM चे महत्व थोडे कमी झाले आहे.
इन्शुरन्स:
आता आपण इन्शुरन्स या विषयाची माहिती घेऊ.
इन्शुरन्स ही एक मोठी जागतिक इंडस्ट्री असून भारतात तिचा प्रसार अतिशय
नगण्य झाला आहे. भारतात 2019 च्या आकडेवारी प्रमाणे तिचा प्रसार लाईफ इन्शुरन्स
2.82 % तर नॉन लाईफ इन्शुरन्स 0.94% एवढाच झाला आहे म्हणजेज तिचा प्रीमियम
देशाच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ( GDP) मध्ये फक्त 3.76 % एवडीच भर घालतो.
इन्शुरन्स इंडस्ट्री मुख्यत्वे 2 भागात विभागली गेली आहे. एक म्हणजे लाईफ
इन्शुरन्स, दुसरे म्हणजे नॉन लाईफ इन्शुरन्स. या दोन्ही विभागात इन्शुरन्स एजंट
पासून ते अगदी इन्शुरन्स एकच्युरी पर्यन्त विविध विभागात रोजगार उपलब्ध
आहेत.
आधी लाईफ आणि नॉन लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय हे समजावून घेऊ.
हे जग नश्वर आहे. येथे केव्हाही, कधीही, काहीही होऊ शकते. कधी वादळ येईल तर
कधी करोना येईल तर कधी एकसिडेंट होऊन अपघातात होऊन शारीरिक अवयव निकामी होतील
किंवा आजारपण आणि कदाचित मृत्य होईल हे सांगता येत नाही.
मुख्यत्वेकरून ज्या गोष्टीत कोणतेही नुकसान होऊ शकते त्या गोष्टी मध्ये
होणाऱ्या नुकसानाची झळ कमी अधिक प्रमाणात भरून काढण्यासाठी एक रिस्क कव्हर (
hedging) म्हणून इन्शुरन्सचा वापर केला जातो. या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी
आहेत आणि उपलब्द होण्याची शक्यता आहे.
त्या पैकी आयुष्या संबंधी इन्शुरन्स हा लाईफ विभागात येतो. यात अनेक
प्रकारच्या लाईफ पॉलिसी, पेन्शन स्कीम ( एन्यूटी ), चाईल्ड पॉलिसी वगैरे असतात. या
मध्ये गुंतवणूक पर्यायापासून ते वेगवेगळ्या रिस्क कव्हर किंवा दोन्ही प्रकारच्या
मिक्स पॉलिसी असतात. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा देशातील सर्वात जुना
आणि मोठा लाईफ इन्सुरर आहे. देशात एकंदरीत 24 लाईफ इन्शुरन्स कम्पन्या आहेत पैकी
23 खाजगी आहेत.
नॉन लाईफ इन्शुरन्स मध्ये पीक विम्यापासून ते अगदी हेल्थ, ग्रुप
इन्शुरन्स,मोटर अँड व्हेईकल, शिपमेंट, ट्रॅव्हल, फायर, बिल्डिंग, मारिन अँड
कार्गो, लॉस ऑफ बिझिनेस, स्टोक ब्रोकर बिझिनेस अशा शेकडो प्रकारच्या पॉलिसी असतात.
भारतात गाडी चालवण्या पूर्वी गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे कारण
तुमच्या गाडीमुळे दुसऱ्याचे नुकसान झाले तर त्याचे रिस्क तुम्ही कव्हर करून
ध्यायचे असते. भारतात द न्यू इंडिया असयुरन्स कम्पनी ( NIA), जनरल इन्शुरन्स
कॉर्पोरेशन (GIC), युनायटेड इंडिया इन्शुरन्स ( UIC), नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन
( NIC). आणि ऍग्रीकलचरल असयुरन्स कम्पनी ऑफ इंडिया अशा 7 सार्वजनिक क्षेत्रातील
इन्शुरन्स कम्पन्या आहेत तर 26 खाजगी नॉन लाईफ इन्शुरन्स कम्पन्या आहेत. या
क्षेत्रात एकदंर 3.5 लाख एवढी मंडळी कायम स्वरूपी काम करतात तर सुमारे 25 लाख एजंट
अप्रत्यक्ष ( indirect employment) काम करतात. भारतात एकंदर 280 बिलियन डॉलर ची
इन्शुरन्स इंडस्ट्री आहे.
भारतात इन्शुरन्स क्षेत्र Insurance Regulation Development Authority
(IRDA ) नियंत्रित करते. भारतात इन्शुरन्स कम्पन्यांना कोणतीही पॉलिसी
स्वतःहून ग्राहकाला विकत घेण्याचा सल्ला ( solicitation) देण्यास बंदी आहे.
त्यामुळे या सर्व इन्शुरन्स पॉलिसी विकण्यासाठी कोणीतरी मध्यस्थी लागतो त्याला
इन्शुरन्स एजंट असे म्हणतात. हे इन्शुरन्स एजंट चे लायसन्स मिळवण्यासाठी 7 दिवसाचा
एक फुल टाइम कोर्स IRDA तर्फे आयोजित केला जातो त्याची फी अतिशय माफक असून तो
कोर्स पास झालात तर त्यातील बरीचशी फी आपणास परत केली जाते. आपण आपली नोकरी किंवा
व्यवसाय संभाळून सुद्धा एजन्सी करू शकतात. यात 20% पर्यन्त अतिशय आकर्षक
कमिशन मिळते. कमीतकमी 12 वि पास झालेली व्यक्ती लासन्सड इंस्युरन्स एजंट होऊ शकते.
या शिवाय वेगवेगळ्या इन्शुरन्स कँपन्यांच्या रिकाम्या जागा भरण्यासाठी
जाहिराती येत असतात तेव्हा कोणताही ग्रॅज्युएट त्यांच्यासाठी अर्ज करून समबंधीत
प्रवेश परीक्षा पास करून पर्मनंट नोकरी मिळवू शकतो. अनेक मराठी मंडळींचा गैरसमज
आहे की इन्शुरन्स कम्पनिमध्ये नोकरी म्हणजे दारोदारी जाऊन पॉलिसी विकणे पण हा पार
चुकीचा समज आहे. ते काम एजंट करतात जे त्या इन्शुरन्स कंपनीचे पर्मनंट नोकर नसतात.
जे लोक पर्मनंट नोकरी करतात त्यांचे काम मुख्यत्वे एजंट मार्फत व्यवसाय वृद्धी
करणे ( डेव्हलपमेंट ऑफिसर. यात मार्केटिंग चा भाग आहे), पॉलिसी सर्व्हिस करणे,
ग्राहकाच्या क्लेमचा निपटारा करणे इत्यादी कमर्शियल आणि अडमिनिइस्ट्रीटीव्ह कामे
ऑफिसमध्ये बसून केली जातात. शिवाय या इन्शुरन्स कम्पनी मध्ये सुद्धा
इन्व्हेस्टमेंट विभाग असतो त्यात मागील इन्व्हेस्टमेंट समबंधी प्रोफेशनल लोक
नोकऱ्या करतात. हल्ली यात इन्शुरन्स कंपन्यांशीवाय मध्यस्थि कम्पन्या, थर्ड पार्टी
क्लेम रिसोल्युशन कम्पन्या सुद्धा काम करत आहेत. स्टॅटिस्टिकस शिकलेल्या
मंडळींना पुढे एकचुरी नावाचा एक विषय असतो. हे काम अतिशय स्पेशलायझेशनचे असते.
प्रत्येक इन्शुरन्स कम्पनी मध्ये एक एकचुरी विभाग सुद्धा असतो तो इन्शुरन्स
प्रीमियम ठरवत असतो.
एकदा आपल्याला नोकरी मिळाली की पुढे प्रमोशन मिळण्यासाठी IRDA च्या
काहीं प्रोफेशनल परीक्षा असतात, त्या पास होणे अवघड नाही पण त्यामुळे प्रमोशन लवकर
मिळते. अतिशय कमी मराठी मंडळी या क्षेत्रात नोकरी करतात. माझ्या जवळचे काही
नातेवाईक या क्षेत्रात नोकरी करत होते. ते सांगतात, आम्ही मराठी मंडळींना सांगून
सांगून थकलो पण कोणीही अर्ज करत नाही आणि फक्त बँकांच्या परीक्षांच्या पाठी
लागतात. या विषयात पूर्वी मद्रासी आणि आता उत्तर भारतीय मंडळी मोठ्या
प्रमाणात शिरत आहेत. मराठी टक्का मोजून ८% सुद्धा नसावा. संधी भरपूर उपलब्ध असतात,
पण माहिती करून घेण्याची तसदी कोण घेणार? प्रत्येकाला प्लेट मध्येच काय तोंडात
भरवून दिले तरी हवे आहे हे मराठी मुलांची आणि त्यांच्या पालकांची मनस्थिती आहे
त्याला कोण काय करणार?
असो काही कमी जास्त लिहिले असेल तर ते सत्य परिस्थिती वर आधारित किंवा
स्वानुभवाने लिहितो, त्यात कोणी राग मानून घेऊ नये.
माधव भोळे