व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 11).
आज आपण एका वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. कोणी त्याला मास मीडिया म्हणतात तर कोणी त्याला मास कम्युनिकेशन म्हणतात. या मध्ये अनेक विषय येतात.
असे म्हणतात की 1609 मध्ये जोहान्स कार्लोस ह्या जर्मन व्यक्तिने जगातील पहिले वृत्तपत्र काढले तर 1779 मध्ये जेम्स ऑगस्टस हिकी ह्या आयरिश माणसाने बंगाल गॅझेट हे भारतातील पाहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी ब्रिटिश काळात प्रथम मराठी वृत्तपत्र "दर्पण" काढून, वयाच्या 20 व्या वर्षी बाळशास्त्री जांभेकर या व्यक्तीने मराठी विश्वात एक क्रांती घडवून आणली.
वृत्तपत्र हे सध्य घडामोडी, मान्यवर व्यक्तींचे किंवा वाचकांचे विचार, वेगवेगळ्या आस्थापनांच्या वस्तू आणि कार्याचा प्रसार करण्याचे मध्यम. आता रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, मोबाईल ह्या नवनवीन माध्यमांमध्ये तांत्रिक विविधता आणि सुधारणांमुळे या विषयाचा जरी गाभा तोच असला तरी त्याचे सादरीकरण करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे, होत आहे. या विषयात नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने Press council of India ची स्थापना केली आहे.
जाहिरात क्षेत्र हे या मास मीडियाचे एक नवे दालन वेगवेगळ्या आस्थापनांच्या उत्पादित, विक्रीयोग्य वस्तूंचा, आपापल्या कामाचा जाहीर प्रसार करण्यासाठी अतिशय उपयुक्त होत आहे. करोना काळात 2020 साली सुद्धा भारताचा जाहिरात क्षेत्रातील खर्च 54,151 करोड रुपये आणि 2021-22 मध्ये तो अंदाजे 80,000 करोड रुपये होणार आहे. यात वृत्तपत्र, रेडिओ, टीव्ही बरोबर आता डिजिटल मार्केटिंग, किंवा ज्याला इंटरनेट आणि मोबाईल मार्केटिंग म्हणतात त्याची सुद्धा भर पडली आहे. जाहिरात क्षेत्रात आर्ट डायरेक्टर, क्रीएटीव्ह आर्ट डायरेक्टर, मीडिया मॅनेजर, कम्युनिकेशन मॅनेजर, मार्केटिंग कम्युनिकेशन मॅनेजर, ग्राफिक डिझायनर, कमर्शियल आर्टिस्ट, डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, एसईओ, वेब डिझायनर या सारखी पदे उपलब्ध असतात आणि त्यांचा मासिक पगार सुद्धा काही 25 हजारांपासून ते काही लाखात असतो. या विषयात Advertising Standards Council of India ही नियंत्रण करणारी सेल्फ रेग्युलेटरी संस्था आहे.
मोठं मोठया आस्थापनांमध्ये जसे की सरकारी कार्यालये, उद्योग समूह इत्यादी ठिकाणी पब्लिक रिलेशन विभाग असून आपल्या आस्थापनांची आवश्यक ती माहिती प्रसार माध्यमांना देण्यासाठी पब्लिक रिलेशन ऑफिसर ही पदे तयार झाली आहेत. या सर्व विषयाशी संलग्न पदे सुद्धा निर्माण होत आहेत.
या विषयात प्रशिक्षण देण्यासाठी आता अनेक विद्यापीठानमध्ये बॅचलर ऑफ मास मीडिया, तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अथवा एम बी ए इन मास मीडिया असे अभ्यासक्रम शिकवले जातात.
भारत सरकारच्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा पास केल्यानंतर ठराविक रँक ला इंडियन इन्फर्मेशन सर्व्हिसेस या विषयात प्रवेश मिळतो आणि ती व्यक्ती भारतीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयात काम करतेे. ही मंडळी दूरदर्शन, तसेच वेगवेगळ्या मंत्रालयात अधिकृत प्रवक्ता ( spokesperson) म्हणून काम करतात. शिवाय सरकारच्या पब्लिसिटी विभागात सुद्धा काम करतात.
भारतीय सूचना आणि प्रसारण मंत्रालय या सरकारी माध्यमातून सुरू असलेली दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (iimc.nic.in) ही संस्था आहे. तेथे
- PGDP Radio & TV journalism
- PGDP Advertising and Public Relation
- PGDP Hindi, English, Oria, Urdu Journalism असे वेगवेगळे
- डिप्लोमा इन डेव्हलपमेंट जर्नालिसम
असे कोर्स शिकवले जातात.
मुंबईत झेवीयर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन ही संस्था खालील कोर्सेस घेते.
(10 months Diploma Courses.)
- Journalism & Mass Communication
- Public Relation and Corporate Communication
- Film, Television and Digital Video Production
- Advertising and Marketing Communication
- Event Planning and Experimental Marketing
- Advance Integration Communication Program ( For Experienced Professionals).
शिवाय असोसिएशन ऑफ बिझिनेस कम्युनिकेटरस ऑफ इंडिया, पब्लिक रिलेशन कन्सल्टंटस असोसिएशन ऑफ इंडिया, वर्ल्ड कम्युनिकेशन असोसिएशन फोरम, डावोस, स्वित्झर्लंड सारख्या प्रोफेशनल बॉडीज या विषयात काम करत आहेत.
माधव भोळे
No comments:
Post a Comment